वारीच्या वाटेवर
गेली दोन वर्षे कोरोनाच्या छायेत गेल्यावर यावर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये वारक-यांची मांदियाळी पहायला मिळतेय. वारी पूर्ववत पार पडल्याचा आनंद आहेच पण या २०/२१ दिवसांत एकदाही वारीत सहभागी होता आलं नाही याचं वाईट वाटतयं.. लहानपणापासूनच मी वारी अगदी जवळून अनुभवत आलेय. वाल्ह्यात माऊलींच्या पालखीला नगरप्रदक्षिणा व्हायची तेव्हा तो सोहळा आमच्या दुकानात बसून मी अनेकदा अनुभवलाय. नंतर दोन किलोमीटरचा रस्ता चालत जायचं आणि भेंडीबाजारच्या मैदानावर जाऊन पालखीचं दर्शन घ्यायचं. संध्याकाळी मम्मीच्या आजोळच्या दिंडीत जेवण करुन परत यायचं हा शिरस्ता होता. पुण्यात शिक्षणासाठी आल्यावर तुकारामांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आकुर्डीच्या विठ्ठल मंदिरात जायचो.. रिपोर्टर म्हणूनही जवळपास सात वर्षे वेगवेगळ्या टप्प्यांवर वारी कव्हर केली. सलग दोन वर्षे वारीचं आळंदी ते पंढरपूर असं कव्हरेज केलं. एकूणच काय तर अगदी काही वर्षांचा अपवाद वगळता हा आयुष्यातल्या प्रत्येक वर्षी हा सोहळा अनुभवला... त्यामुळे वारीसाठी मनातला एक स्पेशल कप्प...