स्तनपानाविषयी बोलू काही
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये दुस-यांदा लॉकडाऊन लागला. त्याचवेळी आमच्या घरात कोरोनाचे पेशंट असल्यानं आम्ही सगळेच क्वारंटाईन होतो. नीतिक्षा तेव्हा साधारणत: साडेपाच महिन्यांची होती. लॉकडाऊनमुळे ब-याचशा नातेवाईकांनी नीतिक्षाला व्हिडीओ कॉलवरच पाहिलेलं. तिच्याशी गप्पाही तिथेच व्हायच्या. एकदा माझ्या आजोबांशी व्हिडीओ कॉल सुरु असताना ते अचानक मला म्हणाले, ' पहिले सहा महिने बाळाला आईचंच दुध द्यायचं असतं, तू तो टप्पा गाठलास. त्याबद्दल तुझं अभिनंदन ! ' त्यांची ही शाबासकी ऐकून मला भरुन आलं. कारण माझ्या आजुबाजूला असणा-या कोणत्याही व्यक्तीने याबाबतीत माझं कौतुक केलं नव्हतं. पण, नको असलेले सल्ले मात्र पावलोपावली मिळत होते. माझे आजोबा ग्रामविकास अधिकारी होते, फक्त मॅट्रिक पास आजोबांना कदाचित त्यांच्या पेशामुळे स्तनपान किंवा ब्रेस्टफिडींग बद्दल माहिती होती, आहे. पण स्वतःला उच्चशिक्षित म्हणवणाऱ्या आणि सतत इंटरनेट हाताशी असणा-या त्यांच्या पुढच्या पिढीच्या मात्र याबाबतीत अनेक गैरसमजूती आहेत. यामुळेच स्तनपान या विषयावर जागरुकता निर्माण करण्यासाठी ...