आईच्या नोकरीची वर्षपूर्ती...
दहा दिवसांच्या सुटीनंतर आठवड्याची सुरुवात झाली ती मिटींग्ज, निकालाच्या बातम्यांचे प्लँनिंग, आठवड्याच्या बातम्या या विषयाने..शिवाय भल्या मोठ्या सुट्टीनंतर मी 'मंडे ब्लू' मध्येच होते ..दिवस सरता सरता आठवलं अरेच्चा 'सकाळ' मध्ये कामाला सुरुवात करून वर्ष लोटलं सुध्दा.. ३ जून २०२३ नेमकी वटपौर्णिमा होती. निगडीच्या मॉडर्न हायस्कूलमधला पहिला दिवसही वटपौर्णिमेचाच..मी कधी फार वटपौर्णिमेची पूजा केली नसली तरी काहीतरी कनेक्शन आहे असं मला सतत वाटतं..तसं आजही वाटून गेलं. झी २४ तास सोडल्यानंतर मी थेट सई दीड वर्षांची झाल्यानंतर जॉब करण्याचा निर्णय घेतला.. गेल्या वर्षी मे मध्ये 'सकाळ' मधून मुलाखतीसाठी फोन आला. मुलाखत, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होता होता समजलं की लगेचच जॉईन व्हावं लागणार. आनंदाने आणि काळजीने पोटात गोळा आला..लगेच जॉईनिंग म्हणजे आता सई आपल्याजवळ दिवसभर नसणार , दिवसभर डे केअरला राहिल का ? माझ्याशिवाय झोपेल का? जास्त वेळ मी दिसले नाही तर रडेल का ?? एक ना अनेक प्रश्न.. एकीकडे करिअर पुन्हा सुरू होतयं हे समाधान दुसरीकडे सईला वेळ देता येईल का याचं गिल्ट...करिअरच्या सुरु...