अध्याय पहिला !
नमस्कार ! मी अश्विनी पवार. गेल्या दहा वर्षांपासून मी पत्रकारितेमध्ये कार्यरत आहे. त्यातील सर्वात जास्त म्हणजेच सात वर्ष 'झी 24 तास' या मराठी वृत्तवाहिनीमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं. 2019 मध्ये झी मधील नोकरी सोडल्यानंतर काही काळ पुर्णवेळ गृहिणी होते. स्वत:चं काही सुरु करता येईल का ? याचीही चाचपणीही केली. पण ओढा कायम पत्रकारितेकडेच राहिला. काही दिवस पेपरमध्ये लिखाण केलं, त्यावेऴी ब्लॉग सुरु करण्याचा विचार पहिल्यांदा मनात आला. पण तो प्रत्यक्षात उतरवता आला नाही. कारण आपल्याला जमेल की नाही ही शंका होती. अधुन मधून फेसबुकवर लिहीत होते. ते वाचून नवरा, सहकारी, मित्र-मैत्रिणी यांनीही अनेकदा 'लिहीत जा' असा आग्रह केला. त्यामुळे काही वर्षांपूर्वी ब्लॉग सुरु करण्याचं मनावर घेतलं. पण माझी टेक्निकल बाजू थोडी कमकुवत असल्यानं डोमेन पासून सुरवात होती. 2020 मध्ये नीतिक्षाचा जन्म झाला आणि सगळ्याच प्रायोरिटीज बदलल्या त्यामध्ये ब्लॉग तर अगदीच मागॆ पडला. जे काही थोडं फार लिखाण व्हायचं तेही फेसबुकच्या वॉलवर. मुलीचं करण्यात 1.5 वर्ष पटकन उडून गेलं. आता काही झालं तरी ब्लॉग सुरु करायचाचं हे ठरवलं आणि पुन्हा जोमाने काम सुरु केलं.
आज आषाढी एकादशीच्या दिवशी प्रत्यक्ष ब्लॉग सुरु करताना फार आनंद होतोय. दरम्यान पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलयं. सध्या मी आकाशवाणी मध्ये कॅज्युअल रिपोर्टर म्हणून काम करतेय. आईपण, काम आणि लिखाण यात थोडीफार कसरत करावी लागतेय. पण लिहीण्यात खंड पडणार नाही याची नक्की काळजी घेईन.
माझा नवरा नीरज जो इंजिनिअर आहे, त्याला मी या ब्लॉगचं श्रेय देईन. कारण त्याला आणि मला प्रवासाचं वेड आहे. प्रवासात वेगवेगळ्या ठिकाणचे पदार्थ आवर्जुन खाण्याची आम्हांला आवड आहे. त्यामुळे कोणत्याही प्रवासाहून परतलो की, तू यावर लिही असं त्याने अनेकदा मोटिवेट केलं. मी मनावर घेत नाही हे पाहून त्याने रागाने बजावलयं सुध्दा ! कदाचीत माझ्याच धरसोड स्वभावामुळे इतका उशीर झालाय. But its better late than never !
एखाद्या विषयावर सखोल लिहायचं म्हणजे त्यात अगदी मास्टरकी असलं पाहिजे असं मला वाटतं. आणि ती माझ्याकडे नाही. त्यामुळे अगदी गंभीर न लिहीता साध्या सरळ विषयांवर लिहायला मला आवडेल. अर्ध्या तपाहून जास्त काळ पत्रकारितेत फिल्ड रिपोर्टिंग केल्यानं त्यातील अनुभव, प्रवास, खाद्यसंस्कृती यावरही लिहीण्याचा माझा प्रयत्न राहिल. यामध्ये सध्या पालकत्वाच्या अनुभवांचीही भर पडलीये. त्यामुऴे प्रेग्नंसी ते पोस्ट पार्टम हेही अनुभवही शेअर करायला आवडतील. तुमचे अभिप्राय आणि सूचना नक्की कळवा !
पहिला ब्लॉग लवकरच !
अश्विनी
खूप शुभेच्छा व आशिर्वाद लिहिते व्हा लिहीत रहा
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर
हटवाखूप मस्त निर्णय घेतला आहे. तुला जे मनापासून वाटेल ते लिही. मला वाचायला नक्कीच आवडेल.❤️
उत्तर द्याहटवाखूप खूप प्रेम ❤
हटवाWarm wishes and good luck 👍 ✨
उत्तर द्याहटवाAll the best tai👍
उत्तर द्याहटवाAnubhav vachayla avdtil, agdi college, career, family pasun ekhadya samajik vishayavril vichar suddha....
Thanks Gauri.. Aaj ch breastfeeding vishayavar blog post kelay.
हटवा